मराठा आंदोलन : मुखेड आगाराची बस पेटवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुखेड

नांदेडहून प्रवासी घेऊन मुखेडकडे येणारी मुखेड डेपोची एसटी बस क्र एमएच-१४ बीटी-१५०३ ही बस मराठा आंदोलनकर्त्यांनी जाळून टाकल्याची घटना नरसी-मुखेड राज्यरस्त्यावर आलुवडगाव येथे मंगळवारी दुपारी एक वाजता घडली. ही घटना घडताच मुखेड आगाराने सर्व एसट्यांची वाहतूक थांबवल्याने प्रवाशी बेहाल झाले आहेत.

मुखेड आगाराची बस क्रमांक एमएच-१४-बीटी-१५०३ ही बस प्रवाशांना घेऊन मुखेडकडे निघाली असता ही बस मराठा मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांनी आलुवडगाव ता. नायगाव येथे अडवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर बसवर रॉकेल टाकून अज्ञात कार्यकर्त्यांनी ही बस पेटवून दिली. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली. या घटनेत बसचे प्रचंड नुकसान झाले. बस पेटवून आंदोलनकर्ते फरार झाले. ही घटना समजताच मुखेड आगार प्रमुख एस.टी. शिंदे घटनास्थळी दाखल झाले. बस जाळल्यानंतर मुखेड आगाराने वाहतूक पूर्ण थांबविली आहे. त्यामुळे प्रवाशी बेहाल झाले. वाहतूक बंद झाल्याने शेकडो प्रवाशी बसस्थानकामध्ये थांबून आहेत.