
राज्यातील पर्यटनप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन येत्या 9 जूनपासून सुरू होत आहे. कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई आणि पन्हाळगडासह राज्यातील इतर सांस्कृतिक आणि तीर्थस्थानांचे दर्शन आता घेता येणार आहे.
प्रवाशांना शिव- जन्मस्थळ आणि शिवरायांचे किल्ले आणि विजयी मोहिमांशी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष जाण्याची संधी मिळणार आहे. या अनोख्या प्रवासासाठी पर्यटकांना विशेष यात्रा पॅकेज मिळणार आहे. ‘आईआरसीटीसीद्वारा संचालित भारत गौरव टुरिस्ट ट्रेन आहे. या उपक्रमातून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास पाहण्याची संधी देशभरातील प्रवाशांना मिळेल. ही गाडी रायगड ते पन्हाळगडपर्यंत धावणार आहे.
6 दिवसांचा प्रवास गडकिल्ले पर्यटन ट्रेनचा प्रवास सहा दिवसांचा असणार आहे. या प्रवासात विशेष पर्यटन मार्गात रायगड, शिवनेरी, प्रतापगड आणि पन्हाळगड, भीमाशंकरचे ज्योतार्ंलग मंदिर आदी स्थळांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच दादर आणि ठाणे स्थानकावरून ही रेल्वे 9 जूनला सुटेल. पॅकेजमध्ये स्लीपर, एसी तृतीय श्रेणी, एसी द्वितीय श्रेणीतून प्रवासाची सोय आणि हॉटेलमध्ये मुक्कामाची सुविधा आहे.