मराठा क्रांती ठोक मोर्चाची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यास राज्य सरकार विलंब करत आहे. सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरुणाला जीव गमवावा लागल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वय समितीने केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक समन्वय समितीने दिली आहे.

मंगळवारी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद अत्यंत शांततेत पाळण्यात येईल. सार्वजनिक परिवहन सेवा, रुग्णवाहिका तसेच अन्य अत्यावश्यक सेवा या बंदमधून वगळण्यात येतील, असे समन्वय समितीने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत दोन दिवसांत निर्णय घेतला नाही तर राज्यभर उद्रेक होईल. त्या परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार असेल असा इशाराही समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीच्या पात्रात उडी घेतली. त्यात त्याचा मृ्त्यू झाल्याने या घटनेचा निषेध करत समन्वय समितीने बंदची हाक देत बंद शांततेत पाळण्याचे आवाहन केले आहे.