
सामना ऑनलाईन । मुंबई
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत झालेल्या भरतीची चौकशी करावी, तसेच मराठा तरूणांना समाविष्ठ केल्याशिवाय भरती करू नये, प्रकल्प ग्रस्तांना भरतीमध्ये समाविष्ठ करावे अशा मागण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी वांद्रे येथील प्रकाश गड कार्यालयात निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री आणि उर्जामंत्र्यांनी या मागण्यांची दखल घ्यावी आणि मराठी समाजाच्या तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महावितरणमध्ये भर्ती प्रक्रियेबात काढलेल्या जाहिरातीमध्ये 6 हजार 542 जागांपैकी सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार 16 टक्के प्रमाणे 1 हजार 46 असताना केवळ 469 दिल्या असल्याचा आरोप मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे. तसेच, 2014 ची विद्युत सहायक भरती, 2016 उपकेंद्र सहायक भरती आणि 24 हजार ग्राम विद्युत वेवस्थापक भरतीमध्ये मराठा तरुणांना समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, सकल मराठा समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन माहावितरणच्या महाव्यवस्थापकांमार्फत देण्यात आले आहे. या वेळी मराठा समाजाच्या वतीने आबा पाटील, रमेश केरे पाटील, प्रणय सावंत, सुनिल नांगणे, युवराज सूर्यवंशी, अभिजीत पाटील यांच्यासह महिला पदाधीकारी देखील उपस्थित होते.




























































