रत्नागिरीत मराठा आरक्षणासाठी निदर्शने, एसटीच्या अनेक फेर्‍या रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत सकल मराठा समाजाने रत्नागिरी, चिपळूण याठिकाणी मोर्चा काढला. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मोर्चाला सुरुवात झाली. मारुतीमंदिर येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा आल्यावर त्याठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी मोर्चा बाजारपेठेपर्यंत नेला. ३ ऑगस्ट बंदला व्यापारी संघटनेने पाठिंबा देऊन बंद पाळला होता त्यामुळे आज रत्नागिरीत बाजारपेठ सुरु होती. मराठा समाजाने पुकारलेल्या संपामुळे आज रत्नागिरी जिल्ह्यात एस.टी.वाहतूक बंद ठेवण्यात आली. १६४० एस.टी.फेर्‍यांपैकी १४९६ फेऱ्या रद्द झाल्या. केवळ १४४ फेऱ्या आज सुरु होत्या.