
सामना ऑनलाईन । हातकणंगले
“खासदार, आमदार तुमची कोरडी सहानभूती नको राजीनामा द्या मग या” असे ठणकावत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांना हातकणंगलेतून परत पाठवले.
खासदार राजू शेट्टी हे बाहुबली येथे दर्शनासाठी जात असतानाच जाता जाता त्यांनी हातकणंगले येथे जाऊन मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांची भेट घेतली. खासदार शेट्टी हे आंदोलन स्थळी पोहोचताच मराठा समाजातील तरुणांच्या भावनांचा उद्रेक झाला. जाताजाता मराठा मोर्चा आंदोलन स्थळाकडे आल्याबद्दल कार्यकर्ते संतप्त झाले. “तुमची सहानभूती नको, बाहुबलीला जाता जाता मराठा मोर्चाला भेट देण्याचे नाटक कशाला करता”’ असे ठणकावत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांना हातकणंगलेतून पळवून लावले.

























































