नगरमध्ये मराठा आंदोलकांचा कडकडीत बंद, सर्वत्र शुकशुकाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
maratha-bandh-nagar

सामना प्रतिनिधी । नगर

आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली असून त्या पार्श्‍वभूमीवर नगर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी ठिय्या आंदोलन, रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी ९.०० वाजता आंदोलनाला सर्वत्र सुरुवात होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाची माहिती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्याभरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी दिली असून यावेळी ड्रोनद्वारे आंदोलनावर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या आठ दिवसापूर्वी सकल मराठा समाजाने विविध ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली होती. सुरुवातीला निदर्शने करून रास्तारोको आंदोलनसुद्धा केले होते. नगर जिल्हयात दोन दिवस प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आली होती. राज्यभर आंदोलनांनी आरक्षणाचा विषय सर्वत्रच लावून धरला होता. राज्यपातळीवर आरक्षणाच्या बाबत चर्चासुद्धा झाल्या होत्या. ९ ऑगस्ट क्रांतीदिनी महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा निर्णय जाहिर करण्यात आला होता. त्या पार्श्‍वभूमीवर काल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची बैठक आयोजित करून शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असा विषयसुध्दा झाला होता. नगर जिल्हयामध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून दोन एसआरपीच्या तुकड्या, २ हजार पोलीस कर्मचारी, ८०० होमगार्ड हा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यात आंदोलनाच्यापूर्वी पोलिसांना निवेदन देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मागील आंदोलनाच्या वेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीसुध्दा मराठा समाजाच्या वतीने प्रशानाला करण्यात आली होती.

उद्या सर्वत्रच बंदची हाक दिल्यामुळे आज बहुधा मध्यरात्रीपासूनच आंदोलनाची सुरुवता होणार असल्यामुळे उद्या जिल्ह्यातील एसटीसेवा बंद राहणार आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने जुन्या बसस्थानकापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रत्येक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे.