मराठा आरक्षणासाठी अहमदपूर येथे चक्काजाम आंदोलन 

सामना ऑनलाईन । अहमदपूर

येथील छत्रपती शिवाजी चौकात मराठा आरक्षणाची मागणी आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. एसटी महामंडळाच्या काही गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. चक्काजाम आंदोलनानंतर तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी चौकामध्ये सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच यावेळी सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते आणि पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. या आंदोलनामध्ये माजी आमदार बाबासाहेब पाटील, दिलीपराव देशमुख, आदी मराठा समाजातील सर्व पदाधिकारी तसेच सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अहमदपूर शहरातून जाणारा रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत चक्काजाम मुळे बंद करण्यात आला होता. या दोन्ही मार्गावरील वाहतूक व्यवस्था पुर्णपणे थांबविण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या