
मराठा आरक्षण तसेच जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आज शनिशिंगणापूर मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. गेल्या तीन दिवसापासून येथे सकल मराठा समाजाच्या युवकांनी साखळी उपोषण सुरू केले असून आज गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळपासूनच व्यवसायिकांनी आपापले दुकाने बंद ठेवले होते गाव बंद असल्याने आज शनी दर्शन साठी येणाऱ्या भाविकांची संख्या अल्प प्रमाणात दिसून आली.
आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी सध्या सर्वत्र साखळी उपोषण व बंदची हाक दिले जात असून शनिशिंगणापूर बरोबरच येथील माका, चांदा पांढरीपुल या ठिकाणी आज कडकडीत बंद पाळण्यात येऊन उपोषणास पाठिंबा व्यक्त केला.



























































