मराठा आरक्षण : राज्य मागासवर्ग आयोगाचे लवकरच गठन, अशोक चव्हाण यांची विधान परिषदेत माहिती 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य मागासवर्ग आयोगाचे लवकर गठन होणार असून, त्यामार्फत मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास केला जाईल, अशी माहिती सार् बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षणकिषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चक्हाण यांनी दिली आहे.

मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीतील तर ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात विधान परिषदेत नियम 97 अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. राज्य शासनाने प्रथम पूनर्विलोकन याचिका दाखल कराकी आणि त्याकर निर्णय झाल्यानंतरच राज्य मागासकर्ग आयोगाचे गठन करावे, अशी शिफारस माजी न्या. दिलीप भोसले यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकार पूनर्किलोकन याचिकेकरील निर्णयाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, त्यास किलंब होत असल्याने स्वतंत्रपणे मागासकर्ग आयोगाचीही प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मागासवर्ग आयोग गठन करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्यांची घोषणा होईल, असे चव्हाण म्हणाले.

भाजप नेत्यांनी खासदार संभाजी राजेंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जी तत्परता दाखवली, तीच तत्परता केंद्राच्या पातळीकर दाखकून 50 टक्के आरक्षण मर्यादा शिथिल केली तर मराठा आरक्षणाच्या अडथळ्यांची शर्यत थोडी सोपी होईल, असे अशोक चक्हाण यांनी सांगितले.