मराठवाड्यातील 21 मंडळात अतिवृष्टी, नद्यांना पूर

संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाडा विभागात पावसाचा जोर कायम आहे. धो-धो कोसळणार्‍या या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. विभागात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे विभागातील 21 महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे, संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज मंडळात सर्वाधिक 106 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. या जिल्ह्यातील शेंदुरवादा आणि चापानेर महसुली मंडळात अनुक्रमे 65, 77 मिलिमीटर अतिवृष्टी झाली आहे. या परतीच्या पावसाचा जोर आणखी दोन दिवस कायम राहील असा अंदाज एमजीएम विज्ञान संस्थेचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दैनिक सामना शी बोलताना व्यक्त केला.

शुक्रवारी रात्रभर धो धो पाऊस कोसळला. या पावसाची एमजीएम केंद्रात 30 आणि चिकलठाणा वेधशाळेत अठरा मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. गेल्या दहा दिवसापासून मराठवाडा विभागात सर्वदूर पाऊस कोसळत आहे, या संततधारेमुळे सर्व जिल्ह्यांनी वार्षिक सरासरीची शंभरी ओलांडली आहे. सर्वाधिक पाऊस संभाजीनगर जिल्ह्यात 167.9 टक्के झाला आहे. संततधारेमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून ढग पडल्यागत पावसाच्या सरी कोसळत आहेत. वाळूज महानगर शुक्रवारी मध्यरात्री जोराचा पाऊस झाला या मंडळात 106 मिलिमीटर पावसाचे नोंद झाली आहे पावसाचा हा जोर विभागात कायम आहे, एका दिवसात सरासरी 17.2 मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाच्या सुत्रानी दिली. एकाच दिवशी सर्वाधिक 40.3 मिलिमीटर पाऊस संभाजीनगर जिल्ह्यात झाला आहे. केवळ हिंगोली वगळता आणि सातही जिल्ह्यात पावसाचा नोंद झाली आहे. विभागात पावसाचा जोर आणखीन दोन दिवस कायम राहील असे औंधकर यांनी नमूद केले. याचा फटका बीड, लातूर धाराशिव जिल्ह्यांना बसण्याची शक्यता त्याने वर्तवली आहे. विभागात आज पर्यंत वार्षिक सरासरीच्या 1 20.00 टक्के पाऊस झाला आहे. सर्वात कमी नांदेड जिल्ह्यात 101.8 टक्के पावसाची नोंद आहे. अन्य जिल्ह्यात झालेला एकूण पाऊस आणि त्याची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे जालना- 616.2 ( 15 3.7), बीड – 59 2.1 (11 9.6 ) लातूर- 69 3.3 ( 10 7.5) धाराशिव +59 0.5 ( 102.2) नांदेड -77 9.2 (101.8), परभणी -74 4.9 (10 8.4) आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये 79 0.6 (11 9.3) पाऊस झाला आहे. कंसातील आकडे वाषिक टक्केवारी चे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या