अभिनेता संतोष मयेकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
संतोष मयेकर

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता संतोष मयेकर यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. बुधवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या अंधेरी येथील राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे.

‘फू बाई फू’ या गाजलेल्या कार्यक्रमातील संतोष मयेकर यांनी साकारलेली विनोदी भूमिका विशेष गाजली. तसेच अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केले. भैय्या हातपाय पसरी या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले होते. तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दशक्रीया, आर्त या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांच्या अचानक जाण्याने चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे.