कोण असणार बिग बॉसच्या घरात? उद्या सस्पेन्सवरून पडदा हटणार

73

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘तो परत येतोय’ असे म्हणत बिग बॉस मराठीच्या दुसर्‍या सीजनला लवकरच सुरुवात होणार आहे. बिग बॉसच्या घरात यंदा कोणते 15 सदस्य असणार, असा प्रश्न आता अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे. टीव्हीवर झळकणारे वेगवेगळे प्रोमोज  प्रेक्षकांच्या उत्सुकतेत आणखी भर घालत आहेत. येत्या रविवारी  सायंकाळी 7 वाजता होणार्‍या दिमाखदार सोहळ्यात या सस्पेन्सवरून पडदा हटणार आहे.

बिग बॉस मराठीच्या दुसर्‍या सीजनचे प्रोमो सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. यंदा मराठी मालिका आणि चित्रपटांतील लोकप्रिय चेहर्‍यांसोबत सेलिब्रेटी शेफ, कवीमनाचा नेता, लावणी नृत्यांगना यांचा समावेश बिग बॉसच्या घरात असणार आहे. नागेश भोसले, सविता मालपेकर, मिलिंद शिंदे, रसिका सुनील, भूषण प्रधान, मनवा नाईक, केतकी चितळे, सुरभी हांडे, प्राजक्ता हनमघर, नेहा पेंडसे, दिगंबर नाईक, अमृता देशमुख या छोट्या-मोठ्या पडद्यावरील कलाकारांशिवाय लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिजित बिचुकले यांची नावे चर्चेत आहेत. यंदा बिग बॉसचे घर लोणावळ्याऐवजी गोरेगावच्या फिल्मसिटीत साकारण्यात आले आहे. यंदाची थीम राजवाडा अशी असणार आहे. 100 दिवस 75 कॅमेर्‍यांच्या नजरकैदेत 15 स्पर्धक असणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या