
‘कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस’, ‘तुमच्यासाठी काही पण’, ‘एकदम कडक’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमांमधून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेला विनोदी अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. कॉमेडीच्या परफेक्ट टायमिंगने त्याने प्रेक्षकांना वेड लावले. आता हाच ‘कॉमेडी किंग’ लवकरच मोठय़ा पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. सानवी प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या एका बिग बजेट मराठी चित्रपटात ओंकार भोजने पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यानिमित्ताने तो एका वेगळ्या अंदाजात चाहत्यांसमोर येणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यातील चित्रीकरण पार पडले. या चित्रपटात ओंकारसोबत मराठीतील दिग्गज कलाकार आहेत. नितीन सुपेकर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.























































