‘मराठी इन कॅनडा’ चे संकेतस्थळ सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनडामध्ये मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. नवीन देशात स्थलांतर करणे म्हणजे एका अर्थाने आयुष्याची नवीन सुरुवात असते. यावेळी अनेक आव्हांनाना सामोरे जावे लागते. ही अडचण ओळखून कॅनडातील मराठी लोकांच्या मदतीसाठी दीप्ती म्हस्के यांनी ‘मराठी इन कॅनडा’ या संस्थेची स्थापना केली होती. 29 ऑगस्ट 2022 ला स्थापन झालेल्या या संस्थेला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ते पाहता जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहोचता यावे, या उद्देशाने विजयादशमीच्या मुहूर्तावर या संस्थेची वेबसाईट सुरू करण्यात आली. ‘मराठी इन कॅनडा’ संस्थेच्या उभारणीत मूळचे मुंबई- कोल्हापूरचे येथील आणि सध्या कॅनडाचे नागरिक असलेले सुजित बेजवाडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन केले आहे. या संस्थेचे आजघडीला हजाराहून अधिक सभासद आहेत. ‘मराठी इन कॅनडा’ च्या माध्यमातून कॅनडामध्ये विविध प्रांतात विखुरलेल्या मराठी माणसांना संघटित करून त्यांच्या कौशल्याचा उपयोग करून घेण्याचा या संस्थेचा प्रयत्न आहे. या संस्थेतर्फे पुरवली जाणारी सेवा ही नि:शुल्क आहे. आपण या संस्थेचे संकेतस्थळ www. mimarathi.ca या लिंकवर क्लिक करून पाहू शकता.