मराठी पत्रकारिता वर्गाची प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेतर्फे माध्यम व्यवस्थापन हा एक वर्ष कालावधीचा पत्रकारितेचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून हा अभ्यासक्रम चालविला जातो. कोणत्याही शाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी पात्र असणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज संस्थेच्या www.giced.co.in या संकेतस्थळावर  उपलब्ध आहेत.

या अभ्यासक्रमात मराठी पत्रकारिता वर्गात अत्यंत अनुभवी पत्रकारांकडून मार्गदर्शन केले जाते. पत्रकारितेचे साकल्याने ज्ञान देण्याबरोबरच कार्यानुभव, प्रोजेक्ट, फील्ड रिपोर्टिंग, ग्रुप डिस्कशन, सेमिनार इत्यादी विविध उपक्रम आयोजित केले जातात. या वर्गासाठी नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत 1डिसेंबर असून, या वर्गाची बहुपर्यायी पद्धतीची प्रवेश परीक्षा शुक्रवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेनंतर त्याचदिवशी तोंडी परीक्षा घेण्यात येईल. नावनोंदणी करणाऱ्य़ा विद्यार्थ्यांना या परीक्षेची लिंक ई-मेल द्वारे पाठविण्यात येईल. अधिक माहितीसाठी खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

(मराठी पत्रकारिता वर्गासाठी संपर्क – श्रीमती नीला उपाध्ये- 022-25221686 नम्रता कडू-7977489076),

आपली प्रतिक्रिया द्या