चित्रपटाच्या  सेटवर मास्क – सॅनिटायझरचा खेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी चित्रपट ‘मराठी पाऊल पडते पुढे’चे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. चित्रपटाच्या टीमने अनोखा खेळ खेळत चित्रीकरणाची सांगता केली. सेटवरील तणावाचे वातावरण कमी करण्यासाठी फावल्या वेळेत चित्रपटाचे निर्माते  प्रकाश बाविस्कर यांनी हा खेळ खेळण्याचा घाट घातला.

लहानपणी आपण मुलांची चपळता अजून वाढावी म्हणून ‘आरसा – टेलीफोन’ हा रंजक खेळ खेळायचो त्याचप्रमाणे ’मास्क-सॅनिटायझर’ हा अनोखा खेळ सेटवर खेळला. चिराग पाटील, अनंत जोग, संजय कुलकर्णी आणि सतीश सलागरे या कलाकारांनी खेळात सहभाग घेतला.