
सामना प्रतिनिधी । मुंबई
प्रेमाची अनोखी भाषा उलगडणारा ‘प्रेमवारी’ हा चित्रपट लककरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे शिर्डी येथे साईबाबांचा आशीर्वाद घेऊन अनावरण करण्यात आले. पोस्टरवर चित्रपटातील मुख्य कलाकार चिन्मय उद्गीरकर आणि मयुरी कापडणे दिसत आहे. मयुरीच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीत नवीन चेहरा येत आहे. येत्या 8 फेब्रुवारीला ‘प्रेमवारी’ प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले आहे.





























































