अमेय-ललित झळकणार झोंबिवलीमध्ये!

578

लॉकडाऊननंतर आता मालिका, चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. नुकताच ‘झोंबिवली’ या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला असून लवकरच लातूरला शूटिंगला सुरुवात होणार आहे. अमेय वाघ आणि ललित प्रभाकरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. आतापर्यंत आपण बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये झोंबीवर आधारित चित्रपट पाहिले आहेत; पण मराठीत पहिल्यांदाच झोंबीवर आधारित सिनेमा बनतोय. या सिनेमाचे शीर्षक इंटरेस्टिंग आहेत आणि डोंबिवलीमधील झोंबीज असे कनेक्शन असल्यामुळे सिनेमाचे नाव ’झोंबिवली’ असे आहे. क्लासमेट्स, माऊली, फास्टर फेणे आदी  चित्रपटांचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर लेखक साईनाथ गणुवाड, सिद्धेश पुरकर, महेश अय्यर आणि योगेश जोशी हे  आहेत. ‘झोंबिवली’ची कथा काय आहे याचे उत्तर पुढच्या वर्षी प्रेक्षकांना मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या