
हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यावर 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम विनायक गोडसे या युवकाने दिल्लीत गांधींची हत्या केली होती. तेव्हा नेमकं काय घडलं? नथुराम गोडसे व त्यांचा मोठा भाऊ गोपाळ गोडसे यांच्या त्यावेळी नेमक्या काय भावना होत्या? त्या भावना ‘गांधीहत्या व मी’ या पुस्तकामध्ये गोपाळ गोडसे यांनी मांडल्या आहेत.
गोडसे यांच्या पुस्तकावर आधारित ‘गांधी हत्या व मी’ हे नाटक लवकरच प्रदर्शित होत आहे. संदेश सुधीर भट यांचे ‘सुयोग’ नाट्यसंस्था निर्मित ८९व्या नाटकाचे दिग्दर्शन महेश डोईफोडे करत असून ते लवकरच रंगमंचावर येत आहे. सौरभ गोखले यात नथुराम यांची भूमिका साकारणार असून रुपाली भोसले सिंधूची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या पुस्तकातून नथुराम गोडसे यांच्या भावविश्वावर प्रकाश टाकण्यात आला आता लवकरच नाट्यरूपात प्रेक्षकांसमोर येत आहे.




























































