मराठी रंगभूमी ‘दीन’, आणीन प्रयोगाला ते हरवलेले तारे

617

5 नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन राज्यभरातच नव्हे, तर जगात जेथे जेथे मराठी रंगकर्मी आहे तेथे तेथे उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदाचा रंगभूमी दिन ‘दीन’ झाल्याचे चित्र आज मुंबईसह ठिकठिकाणच्या नाटय़गृहांवर पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी नाटकांचे प्रयोग तर झाले नाहीतच, पण सोशल मीडियावरही शुभेच्छांच्या नाटकावर पडदा पडला होता.

मराठी नाटकांना प्रेक्षक मिळत नाही अशी बोंब निर्माते आणि नाटय़व्यवस्थापक ठोकतात; मात्र ते अर्धसत्य आहे. कारण पूर्वी छबिलदास ते रुपेरी पडदा व्हाया शिवाजी मंदिर असा प्रवास करणारे कलाकार आत शिवाजी मंदिरचा कट्टा वगळून थेट मालिकेत जाऊ लागले आहेत. चांगली संहिता आणि प्रेक्षक मिळत नाही या तक्रारींच्या यादीत आता कलाकारही मिळत नाहीत ही तक्रारही नोंदवून घ्यावी लागेल.

राजेश चंद्रकांत देशपांडे याने रंगभूमी ‘दीन’ का झाली याचे नेमके वास्तव मांडणारी कविता सुरेश भट यांची माफी मागून लिहिली आहे. ती सर्व कलाकारांच्या डोळय़ांत अंजन घालणारी आहे.

राजेश देशपांडे लिहितो…

गे रंगभू तुझे मी

फेडीन पांग सारे,

आणीन प्रयोगाला

ते हरवलेले तारे।।1।।

माये तुझ्या पुढे गं

नाही कुणीही शाणा,

HOUSEFULL होतो

अजुनी मराठी बाणा ।।2।।

आये तुझ्या पुढे ही 

माझी व्यथा कशाला,

मी छबिलदासी आता

झालो डेली सोपवाला।।3।।

मी पायधूळ घेतो

जेव्हा तुझी जराशी,

शिवाजीस डेट नाही

लागे प्रयोग वाशी ।।4।।

आई तुझी अशी मी

गाईन रोज गाणी,

कथेत मालिकेच्या

टाकीत रोज (गार) पाणी।।5।।

आपली प्रतिक्रिया द्या