मराठी भाषेत साईबाबांवर 20 वर्षानंतर पुन्हा नवी मालिका, 15 मार्च पासून “फक्त मराठी” वाहिनीवर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साईबाबांवर “फक्त मराठी वाहिनी”ने मराठीमध्ये ‘साई बाबा – श्रद्धा आणि सबुरी’ या नव्याकोऱ्या मराठी मालिकेची निर्मिती आहे. या निमित्तानं जवळपास 20 वर्षांनी टेलिव्हिजनवर साईबाबांची मालिका प्रसारित होणार आहे. येत्या 15 मार्च सोमवारपासून दररोज सांयकाळी  8 वाजता फक्त मराठी या मनोरंजन वाहिनीवर ही नवी मालिका प्रसारित होणार आहे.

अभिमान भाषेचा… वारसा कलेचा हे ब्रीद खरं ठरविणाऱ्या फक्त मराठी मनोरंजन वाहिनीने नाविन्याची कास धरीत असंख्या दर्जेदार  चित्रपटांसोबतच नवनव्या अनोख्या कार्यक्रमांची निर्मिती करून मनोरंजन क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रियता मिळावीत आहे.

साई बाबा – श्रद्धा आणि सबुरी’ या मालिकेच्या निर्मितीबाबत फक्त मराठी वाहिनीचे बिझनेस हेड श्याम मळेकर म्हणाले आमची वाहिनी मराठीतील प्रमुख मनोरंजन वाहिन्यांपैकी एक असून सातत्याने वाहिनीने दर्जेदार मनोरंजनाची कास धरत प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल मिळविला आहे. नव्या अनोख्या विषयांवरील दर्जेदार कलाकृतींच्या निर्मितीवर वाहिनीने सतत भर दिला आहे. साईबाबा हे महाराष्ट्रातीलच नव्हते तर जगभरातील सर्व जाती धर्म पंथातील लोकांचे श्रद्धास्थान आहेत. गेल्या 20 वर्षात त्यांच्यावर मराठी टेलिव्हिजनवर नवी निर्मिती झाली नाही हे आमच्यासाठी विशेष आहे.

या मालिकेतील मुख्य भूमिका अभिजित पवार या अभिनेत्याने केली असून त्यांच्यासोबत दिप्ती भागवत, ओंकार कर्वे, अंजली दिलीप, वेद आंब्रे,  ज्ञानेश वाडेकर, नंदिनी वैद्य, दिनेश कानडे, संदीप रेडकर, बबन जोशी, निलेश माने, प्रतिक अंगणे, प्रसाद रावराणे, आस्ताद काळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.