‘रंग माझा वेगळा’ नव्या वळणावर

नात्यांचे बदलते रंग स्टार प्रवाहच्या ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत पाहायला मिळणार आहेत. मालिकेत लीप वर्ष येणार असून कथानक 14 वर्षांनी पुढे सरकणार आहे. सध्या मालिकेत कार्तिकला साक्षीच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार ठरवत 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. संपूर्ण कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. न्यायालयाच्या निर्णयासमोर दीपाही हतबल झालीय. काही दिवसांपूर्वीच दोघांमधील गैरसमज दूर होऊन त्यांनी आपल्या नात्याची नवी सुरुवात केली होती. मात्र दीपा-कार्तिकचा आनंद नियतीला मान्य नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा दोघंही एकमेकांपासून दुरावलेत. दुराव्याच्या याच वळणावर मालिकेचे कथानकही पुढे सरकणार आहे. दीपिका-कार्तिकी मोठय़ा झालेल्या दिसतील.