युरोपमध्ये मराठी नाट्यकलेचा जागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी रंगभूमी ही महाराष्ट्रातील नाटय़परंपरेचा अत्यंत समृद्ध आणि महत्त्वाचा भाग आहे. या महान परंपरेचा वारसा लाभलेल्या मराठी रंगभूमीचे पडसाद आता युरोपमध्येही उमटू लागले आहेत. याच नाटय़कलेच्या समृद्ध परंपरेने प्रेरित होऊन 4 आणि 5 एप्रिल रोजी नेदरलँड्स येथे युरोपमधील पहिली एकांकिका स्पर्धा अभिमंच थिएटरतर्फे आयोजित केली आहे.

या स्पर्धेसाठी इंग्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, बेल्जियम आणि नेदरलँड्समधूनही उत्तुंग प्रतिसाद मिळाला आहे. या 2 दिवसांमध्ये तब्बल 14 एकांकांची मेजवानी नाटय़प्रेमींना अनुभवता येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विजय पेंकरे, अभिनेते संजय मोने परीक्षकांची भूमिका बजावणार आहेत. यानिमित्ताने युरोपमध्ये मराठी नाटय़कलेचा जागर घडणार आहे.