तारकर्ली- देवबाग कोस्टल मॅरेथॉन; राज्यभरातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

युनायटेड स्पोर्ट्स अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हेंचर्स व लायन्स क्लब यांच्यावतीने आणि मालवण डिजिटल, इंडियन रेडक्रॉस सोसायटी सिंधुदुर्ग, श्री पाटीदार (पटेल) समाज, मालवण क्लब महिंद्रा यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या तारकर्ली-देवबाग कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, गोवा, गुजरात, बंगलोर येथील स्पर्धक सहभागी झाले होते. तारकर्ली एमटीडीसी येथून पहाटे या स्पर्धेस सुरवात झाली. 21, 10, 5, 3 किलोमीटर अशा अंतराच्या विविध गटांच्या स्पर्धा झाल्या.

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष महेश कारेकर, उदय घाटवळ, विराज आचरेकर आदी उपस्थित होते. यावेळी 42 वेळा रक्तदान केलेल्या मुकेश बावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धा यशस्वीततेसाठी युनायटेड स्पोर्ट्स अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हेंचर्स डोबिंवलीचे सदस्य विकास मोरे व त्यांच्या टीमने तसेच अन्य संस्थांच्या सदस्यांनी मेहनत घेतली.

  • स्पर्धेचा निकाल
    एकवीस किलोमीटर पुरुष ( वय 18 ते 30)
    अनुक्रमे अमित भोसले, सौरभ पुडे, पौलमिनीन फर्नांडिस
  • (वय 31 ते 40)
    अमित कुमार, प्रवीण कुमार, जय माली
    (वय 41 ते 50)
    टायसन, डॉ. स्नेहल गोवेकर, डॉ. भास्कर पाटील
  • (वय 50 वर्षावरील)
    एवगेन क्वॉड्रस, जगदीश रेड्डी, अनंत क्षीरसागर
  • महिला गट ( वय 18 ते 30)
    प्राची अगरवाल, अंजली धिंग्रा
  • (वय 31 ते 40)
    अनघा बोर्डवेकर, डॉ. ज्योती पाटील
  • (वय 41 ते 50)
    माधवी खराडे, रिंपल सक्सेना
    (वय 50 वर्षावरील)
    माधवी निमजे, श्रद्धा रनारवरे
  • दहा किलोमीटर पुरुष ( वय 8 ते 30)
    आदित्य निर्गुण, लोकेश पाटील, सौमित्र रॉय
  • (वय 31 ते 40)
    अमोल घनात, लोहित आचार्य, विनय भूषण
  • (वय 41 ते 50)
    मनोज आंगणे, सचिन कडवे, प्रमोद भगते
  • (वय 50 वर्षावरील)
    अतुल बांदिवरेकर, मकरंद काजरेकर
  • महिला गट ( वय18 ते 30)
    श्रावणी पालव, पूजा मळगावकर, डॉ. चैताली
  • ( वय 31 ते 40)
    लिपी कलिता, देवयानी कदम, गार्गी ओरसकर
  • (वय 41 ते 50)
    विद्या डिसोझा, अर्चना गोरे, श्रीमती देशपांडे
  • (वय 15 वर्षाखालील)
    पूर्वा गावडे
  • तीन किलोमीटर पुरुष
    प्रथमेश राणे, तेजस दळवी, मयुरेश राणे
    महिला
    अंगारिका सारंग, प्राची कोकरे, सिमरन शेख
    पाच किलोमीटर पुरुष
    संतोष वेंगुर्लेकर, जीवन, प्रणील खराडे
    महिला
    स्वप्नाली बेनकर, मधुरा वाडकर