
सामना प्रतिनिधी, मुंबई
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱया ‘सार्थ प्रतिष्ठान’ या अग्रगण्य संस्थेने येत्या रविवारी (3 मार्च) कॅन्सरच्या (कर्करोग) जनजागृतीसाठी धावण्याच्या शर्यतीचे आयोजन केले आहे. शिवाजी पार्क येथून पहाटे पाच वाजता ‘कँथोन रन’ला या शर्यतीला सुरुवात होणार असून यामध्ये नामवंत ऍथलीटसह तीन हजारांपेक्षा जास्त धावपटू धावणार आहेत.
या शर्यतीचे उद्घाटन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात येणार असून याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राहुल शेवाळे, अरविंद सावंत, आमदार सदा सरवणकर, सुनील शिंदे, विभागप्रमुख, नगरसेवक आशीष चेंबूरकर, किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, शिवसेना सचिव आदेश बांदेकर या मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यरत असून स्व. महेश बोभाटे या संस्थेचे संस्थापक विश्वस्त आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फिटी झोन या कंपनीचे विशेष सहकार्य मिळत आहे. प्रतिष्ठानचे विश्वस्त दिनेश बोभाटे, उमेश नाईक, मंगेश कदम, श्याम चित्रे, प्रथमेश बोभाटे, विलास जाधव, श्रीराम विश्वासराव, नितीन शिरोडकर, मनोज वारंग, मिनेश बोभाटे, अमोल कदम हे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम करीत आहेत. ही शर्यत पहाटे पाच वाजता शिवाजी पार्क येथून सुरू होईल. त्यानंतर वरळी, हजीअली मार्गे पुन्हा शिवाजी पार्क येथे येऊन संपेल.
अल्ट्रा रनर नझमीन झफरही धावणार
अल्ट्रा रनर नझमीन जफरही शिवाजी पार्क येथे होणाऱया या शर्यतीत धावणार आहे. यावेळी ती म्हणाली, कर्करोगामुळे मी माझ्या पालकांना तसेच बहिणीला गमावले. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराविषयी लोकांना माहिती व्हावी, जगजागृती व्हावी यासाठी या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मीही 50 कि.मी. शर्यतीत धावणार असून चंद्रन हा माझा रनिंग पार्टनरही माझ्यासोबत असणार आहे.


























































