परतीच्या पावसाने मराठवाडय़ाला झोडपले

316

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागातील नांदेड, बीड, लातूर आणि धाराशीव या चार जिह्यांत परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. या जिल्ह्यांतील 14 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस लातूर जिह्यातील तांदुळजा येथे 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा विभागात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. परिणामी या भागातील नागरिकांना सतत दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या