
मराठवाड्यामध्ये पावसाचा अक्षरश: धुमाकूळ सुरू आहे. नदी-नाले तुडुंब झाले आहेत असून धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे अनेक महामार्ग पाण्याखाली गेले असून काही भागातील गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या 10 ते 12 तासापासून या भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली असून प्रशासन अलर्ट आहे.
वाचा प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपटेड –
- कळंब तालुक्यातील सापनाई येथील तेरणा नदीत गाय वाहून गेली, शेतकऱ्याचं मोठं नुकसान
कळंब तालुक्यातील सापनाई येथील तेरणा नदीत गाय वाहून गेली, शेतकऱ्याचं मोठं नुकसान #rain #MarathwadaRain pic.twitter.com/vivSul4B9R
— Saamana Online (@SaamanaOnline) September 27, 2025
- अंबुलगा बुद्रुक येथे ओढ्याचे पाणी शेतात शिरले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या पाण्यामुळे रस्ताही वाहून गेला आहे.
अंबुलगा बुद्रुक येथे ओढ्याचे पाणी शेतात शिरले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या पाण्यामुळे रस्ताही वाहून गेला आहे. #latur #Heavyrain pic.twitter.com/UVWcO4C7Xq
— Saamana Online (@SaamanaOnline) September 27, 2025
- जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथे नदीची पाणी पातळी वाढली, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
- किनगाव-अहमदपूर रोडवरील कोपरा गावालगत वाहणाऱ्या मन्याड नदीला पूर आल्याने नदीकाठच्या नागरिकांना कोपरा सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तसेच या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व बस सेवा थांबविण्यात आली आहे.
किनगाव-अहमदपूर रोडवरील कोपरा गावालगत वाहणाऱ्या मन्याड नदीला पूर आल्याने नदीकाठच्या नागरिकांना कोपरा सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तसेच या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व बस सेवा थांबविण्यात आली आहे. pic.twitter.com/AhYo63a4ME
— Saamana Online (@SaamanaOnline) September 27, 2025
- हिंगोलीमध्ये पावसाचा हाहाकार सुरू
- बीड शहरात शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण पोलीस ठाणे अन् शिवाजीनगर पोलीस ठाणेही सध्या पाण्यात आहे. गुडघ्याएवढे पाणी साचल्याने दोन्ही पोलीस ठाण्यातील काम सध्या बंद आहे.
- नांदेड जिल्ह्यातील शिरूर (मुखेड) मार्गावर वळसंगी येथे पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील शिरूर (मुखेड) मार्गावर वळसंगी येथे पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. pic.twitter.com/5hRSkKHYUk
— Saamana Online (@SaamanaOnline) September 27, 2025
- धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्हे पाण्याखाली
- लातूरच्या जळकोट तालुक्यातील रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. तालुक्यातील अनेक मार्गावरील वाहतूक पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद करण्यात आली आहे
लातूरच्या जळकोट तालुक्यातील रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. तालुक्यातील अनेक मार्गावरील वाहतूक पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद करण्यात आली आहे pic.twitter.com/64uAtdkZj7
— Saamana Online (@SaamanaOnline) September 27, 2025
- शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे बसपूर ते बाकली जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे बसपूर ते बाकली जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे… pic.twitter.com/fpf170CJUc
— Saamana Online (@SaamanaOnline) September 27, 2025
- कळंबमध्ये पावसाचा हाहाकार, बागवान चौकातील नगर परिषदेतील गाळ्यांमध्ये पाणी शिरलं
कळंबमध्ये पावसाचा हाहाकार, बागवान चौकातील नगर परिषदेतील गाळ्यांमध्ये पाणी शिरलं pic.twitter.com/ZBzyf386wz
— Saamana Online (@SaamanaOnline) September 27, 2025
- लातूरमधील औसा तालुक्यातील मौजे एरंडी ते औसा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
लातूरमधील औसा तालुक्यातील मौजे एरंडी ते औसा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. pic.twitter.com/gtuSCciHvk
— Saamana Online (@SaamanaOnline) September 27, 2025
- परभणीतील गंगाखेड येथे रात्रीतून 143 मिलीमीटर पाऊस झाला.
- लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पेठ व चांडेश्वर येथे पूर परिस्थितीची पाहणी केली.
- माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले, 80 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू
- धाराशिवमध्ये बाजारपेठेत पाणी घुसलं
- जालन्यामध्ये तुफान पावसाला सुरुवात
- बीड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच; 18 महसूल मंडलात अतिवृष्टी, नद्यांना पूर
Beed Rain Update – बीड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच; 18 महसूल मंडलात अतिवृष्टी, नद्यांना पूर
- हिंगोलीत ढगफुटी, वसमतमध्ये परिस्थिती बिकट; हिंगोली-पुसद मार्ग बंद, विदर्भाशी संपर्क तुटला
- धाराशिव तालुक्यातील आरणी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना सुखरूप वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
धाराशिव तालुक्यातील आरणी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना सुखरूप वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. #rain #MarathwadaRain pic.twitter.com/UF7oPZM0pc
— Saamana Online (@SaamanaOnline) September 27, 2025
- धाराशिवमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू असल्याने एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. तसेच आपत्ती निवारण पक्षही कार्यान्वित झाले असून परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण येथे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
- लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील हागदळ पुलावर पाणी, वाहतूक बंद
लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील हागदळ पुलावर पाणी, वाहतूक बंद#Marathwada #flood pic.twitter.com/JIlKdJ1Mk3
— Saamana Online (@SaamanaOnline) September 27, 2025
- मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील नद्यांना पुन्हा पूर आला आहे. पाटसांगवी येथील दुधना नदीने रौद्ररुप धारण केले असून नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
धाराशिव पाऊस अपडेट – मुसळधार पावसामुळे भूम तालुक्यातील नद्यांना पुन्हा पूर आला आहे. पाटसांगवी येथील दुधना नदीने रौद्ररुप धारण केले असून नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. pic.twitter.com/c5V2IVbjJo
— Saamana Online (@SaamanaOnline) September 27, 2025
- लातूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून अहमदपूर तालुक्यातील थोडगा येथील पुलावरून पाणी जात आहे. त्यामुळे थोडगा-मोघा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. पर्यायी रस्ता टेंभुर्णी -हसरणी-धानोरा खू. मार्गे आहे.
थोडगा येथील पुलावर पाणी, थोडगा मोघा रस्ता बंद#marathwada #latur #flood pic.twitter.com/jMG5iUO59Y
— Saamana Online (@SaamanaOnline) September 27, 2025
- नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात शनिवारी पहाटे 3 वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर कायम राहण्याची चिन्ह असून हवामान विभागाने नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना शनिवारी सुट्टी देण्यात आली आहे.
- लातूरच्या मान्याड नदीच्या पाणी पातळीत वाढ, शेणकुडमधील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद
लातूरच्या मान्याड नदीच्या पाणी पातळीत वाढ, शेणकुडमधील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद#latur #marathwada #flood pic.twitter.com/Cy6yzrfWBm
— Saamana Online (@SaamanaOnline) September 27, 2025
-
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात; नदी-नाले तुडुंब, शेतीचे प्रचंड नुकसान. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट.
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात; नदी-नाले तुडुंब, शेतीचे प्रचंड नुकसान. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट. pic.twitter.com/CIu9pCBYAP
— Saamana Online (@SaamanaOnline) September 27, 2025