भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यावर करडी नजर! सिमी, इंडियन मुजाहिदीनचा स्लीपर सेल सुरक्षा यंत्रणाच्या रडारवर

भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर घातपाती कृत्य घडवून आणण्याचे षड्यंत्र दहशतवादी संघटना आखू शकतात, त्यामुळे गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मराठवाडय़ातील दहशतवादाचा इतिहास पाहता या भागात अजूनही सिमी, इंडियन मुजाहिदीन, तौफीक ए अन्सार आदी दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल कार्यरत आहेत. एनआयए, आयबी तसेच एटीएसने या स्लीपर सेलवर करडी नजर ठेवली असून मराठवाडय़ातील सर्वच जिल्हय़ांना यासंदर्भात सक्त सूचना करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी अड्डे नेस्तनाबूत केले. सध्या सीमेवर अत्यंत स्पह्टक परिस्थिती आहे. पाकिस्तानने नेहमीप्रमाणे दहशतवादी संघटना आणि त्यांच्या स्लीपर सेलचा आधार घेत आहेत. देशातील काही घातकी स्लीपर सेलचा वापर करून घातपाती कारवाया घडवून आणण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाडय़ातील नांदेडपासून परभणी, जालना, उदगीर, छत्रपती संभाजीनगर, बीड, वैजापूर येथील सिमी तसेच इंडियन मुजाहिदीनच्या स्लीपर सेलचा काळाकुट्ट इतिहास पाहता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. एनआयए, आयबी आणि एटीएसने या इतिहासाचा धांडोळा घेतला असून स्लीपर सेलवर करडी नजर ठेवण्याचे आदेश संपूर्ण यंत्रणेला दिले आहेत.

ऑनलाइन गेमिंग, सोशल मीडियावर वॉच
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यामुळे या नागरिकांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणावरून सुरक्षा यंत्रणांकडून माहिती गोळा केली जात आहे. दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल हे ऑनलाईन गेमिंग, सोशल मीडियाच्या माध्यमातून संपका&त आहेत का, याची तपासणी या गुप्तचर यंत्रणेने सुरू केली आहे. त्यातच सोशल मीडियावर व्यक्त होणाऱया कॉमेंटवरही लक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.