‘मर्दानी-2’ चा ट्रेलर हिट, राणी पुन्हा रणरागिणीच्या रुपात

922
mardani-2-trailer

‘मर्दानी-2’ लवकरच प्रेक्षकांचा भेटीला येत आहे. 2014 साली राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपाटत राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती. राणी मुखर्जी ही एका रूबाबदार पोलीस इन्स्पेक्टर ‘शिवानी शिवाजी राव’च्या रुपात प्रेक्षकांना चांगलीच भावली. तिच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं.

प्रेक्षकांनी ‘मर्दानी’ चित्रपटाला दिलेली पसंती पाहून ‘मर्दानी-2’ची घोषणा करण्यात आली. ‘मर्दानी-2’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

चित्रपट कोटा मधील एका सत्य घटनेवर आधारित आहे आणि राणी पुन्हा एकदा पोलीस इन्स्पेक्टरच्या रुपात दिसणार आहे.

कथानक

या चित्रपटाची कथा राजस्थानमधील कोटा येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेवर आधारित असून. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, कोटामध्ये एका तरुणीचा बलात्कार करून खून करण्यात येते आणि तिचा मृतदेह गटारीत फेकण्यात येतो. या घटनेमागे कोण आरोपी आहे याचा शोध ‘शिवानी’ (राणी मुखर्जी) घेत असतानाच आणखी एकाचा तरुणीचा बलत्कार होणार आहे, अशी माहिती समोर येते आणि हा बलात्कार रोखण्याचा प्रयत्न शिवानी करत असते. ट्रेलमध्ये आरोपी कोण आहे हे रहस्य ठेवण्यात आले आहे. परंतु त्याचा आवाज ऐकवण्यात आला आहे.

राणीचा लुक

मर्दानी-2 चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकणारा ठरला आहे. राणी मुखर्जी एका रुबाबदार पोलीस इन्स्पेक्टरच्या वेशात दिसणार आहे. या रुपात राणी मुखर्जी अप्रतिम दिसत असल्याचे नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या