मार्कंडेय रुग्णालयातील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही; परिस्थिती नियंत्रणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर येथील श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात बुधवारी रात्री ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली. अग्निशमन दलाने पाण्याचा फवारा मारुन परिस्थिती नियंत्रणात आणल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरच्या झालेल्या स्फोटामुळे सिलेंडरमधील पांढरे पावडर रुग्णालयाच्या इमारतीसह रस्त्यावरही पसरल्याने रुग्णांमध्ये व परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे.