
आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी जोरदार तेजीने शेअर बाजाराची सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 638 अंकांनी वधारून 85,567 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 206 अंकांच्या तेजीसह 26,172 अंकांवर बंद झाला. जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक वातावरण आणि देशी गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. आयटी आणि धातू क्षेत्रातील कंपन्याच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 5,700 कोटी, तर परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1,830 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. या संस्थांनी डिसेंबर महिन्यात 19 डिसेंबरपर्यंत 52 हजार कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. रुपया डॉलरच्या तुलनेत स्थिर राहताना दिसत आहे. तसेच हिंदुस्थानने न्यूझीलंडसोबत मुक्त व्यापार करार केला आहे. याचाही परिणाम दिसत आहे.


























































