श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे गर्दी टाळण्यासाठी मार्च महिन्यात बंद करण्यात आलेली मंदिरे सोमवारपासून भाविकांसाठी खुली होणार आहेत. कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले होते. तसेच मंदिरात गर्दी होऊ नये, यासाठी मंदिरेही बंद करण्यात आली होती.

आता लॉकडाऊनमधील काही निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. त्यात सोमवारपासून मंदिरे भाविकांसाठी शुली होणार आहेत. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले पर्यटक आणि भाविकांच्या गर्दीने फुलुन जाणारे श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिर सोमवारपासून भाविकांसाठी खुले होत आहे. देवस्थान मंडळाने गर्दी टाळण्यासाठी नियम पाळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देण्याचे ठरवले आहे. या भागात रिमझिम पाऊस झाल्याने येथील धबधबा प्रवाही झाला आहे. पावसाचा जोर वाढताच हा धबधबा सुरक्षेच्या कारणास्तव बंद केला जाणार असल्याचे देवस्थान समितीने म्हटले आहे.