
ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नस लॅबुशेन याने हिंदुस्थानचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. तो यावेळी म्हणाला, हिंदुस्थानी संघातील सर्व गोलंदाज चांगले आहेत, पण जसप्रीत बुमराहचे कडवे आव्हान परतवून लावण्यासाठी आम्हाला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये ताशी 140 किमी वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता आहे. चेंडू स्विंग होण्यासाठी चांगले असलेल्या वातावरणात तो आणखी प्रभावी ठरू शकतो, असे मार्नस लॅबुशेन पुढे म्हणाला.



























































