सुंदर मूल पाहिजे म्हणून एक महिला आपल्यासोबतच पळून गेल्याची खळबळजनक घटना मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये घडली आहे. यानंतर पतीने थेट पोलिसात धाव घेतली आहे. फरार पत्नी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचे पतीने पोलिसांना सांगितले.
महिलेचा 10 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र जोडप्याला अद्याप मूल झाले नाही. महिलेचा पती दिसायला सामान्य आहे. पतीच्या तुलनेत दीर दिसायला सुंदर आहे. त्यामुळे आपल्याला सुंदर मूल व्हावे म्हणून महिला दिरासोबत शारीरिक संबंध ठेवत होती. मात्र सासूला याबाबत कळाल्याने तिने विरोध केला. यामुळे महिला दिरासोबत पळून गेली.
पळून गेल्यानंतर महिलेने पतीला मॅसेज करत ‘मी आत्महत्या करेन आणि याला कुटुंबीय जबाबदार असतील’ असे म्हणत आहे. यानंतर पतीसह कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत न्यायाची मागणी केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.