मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात एका विवाहित महिलेकर तिघा मित्रांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर विवाहितेने तलावामध्ये उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने मंगळकेढा तालुका हादरून गेला आहे.
सुरज सुभाष नकाते (वय 29), तोसिफ चाँदसा मुजाकर (वय 24), शुभम मोहन नकाते (वय 24) या नराधम मित्रांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी व पीडित महिलेचे पती कुटुंबासह पुणे येथे राहावयास होते. हे कुटुंब 28 जुलै 2024 रोजी मंगळवेढ्य़ातील मूळ गावीआले होते. यातील आरोपी हा नातेवाईक असल्याने तो नेहमी पुणे येथे फिर्यादी घरी नसतानाही ये-जा करीत असे. तो नातेवाईक असल्याने पीडितेच्या पतीला कुठलाही संशय आला नाही. यातील तिघे आरोपी एकमेकांचे खास मित्र आहेत. 21 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी मयत विवाहिता तिच्या आईला भेटण्यासाठी जाऊन येते, असे सांगून गेली होती. दुपारी गावातील एका नागरिकाने पीडितेच्या पतीला फोन करून पीडितेचा मृतदेह तलावात आढळल्याची माहिती दिली. हे कळताच फिर्यादी तत्काळ घटनास्थळी गेले. तेव्हा त्यांना तलावाच्या काठावर पत्नीचा मोबाईल व चप्पल दिसली. नागरिकांच्या मदतीने पीडित महिलेला बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी आरोग्यकेंद्रात दाखल केले होते. मात्र, ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेनंतर पीडितेच्या मोबाईलवरील हिस्ट्री चेक केली असता, तिघे आरोपी अनैतिक संबंध ठेवण्याबाबत विवाहितेला शारीरिक त्रास देत असल्याचे दिसून आले. या त्रासाला कंटाळून तलावात उडी मारून विवाहितेने आत्महत्या केल्याचे पतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी विक्रांत गायकवाड, निरीक्षक महेश ढकाण यांनी तपासाची चक्रे केगाने फिरकून तीनही आरोपींना गजाआड केले. उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे यांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सुरज नकाते याला तीन दिवस, तोसिफ मुजाकर यास दोन दिवस क शुभम नकाते याला चार दिवस पोलीस कोठडी दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली असून, नराधम आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.