
रक्तवर्णीय मंगळाचे रहस्य उलगडण्यास आता मदत होणार आहे. अमेरिकेच्या ‘नासा’ अंतराळ संस्थेच्या ‘पर्सिव्हिअरन्स रोव्हर’ यानाने आज मंगळावर यशस्वी लँडिंग केले. हिंदुस्थानी वेळेनुसार पहाटे अडीच वाजता या यानाने मंगळाला स्पर्श केला. मंगळवार जीवसृष्टी अस्तित्वात होती का याचे ठोस पुरावे या मोहिमेमुळे मिळणार आहे. याशिवाय मानवाला मंगळावर पाठवण्यासाठी काय तयारी करावी लागेल याबद्दलही या मोहिमेत संशोधन केले जाणार आहे.
कोटय़वधी वर्षांपूर्वी वाहत होती नदी
जीझीरो व्रेटरच्या पृष्ठभागाची रचना आणि अन्य पुरावे पाहता साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी तिथे नदीचा प्रवाह आणि त्रिभुज प्रदेश होता असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. तिथे पाण्याचे एक तळेही होते असे सांगण्यात येते. त्या परिसरात सूक्ष्मजीव अस्तित्वात होते असेही त्यांचे म्हणणे आहे. तेथील दगड आणि मातीच्या परीक्षणानंतर त्याबद्दल स्पष्ट होऊ शकणार आहे.




























































