
मंगळ ग्रहाच्या फिरण्याच्या वेगाने खगोलशास्त्रज्ञांना आश्चर्यचकित केले आहे. नासाच्या इनसाइट लँडरच्या आकडेवारीनुसार, मंगळ आपल्या अक्षावर पूर्वीपेक्षा वेगाने फिरत आहे. ज्यामुळे लाल ग्रहावरील म्हणजेच मंगळावरील दिवस आता लहान होत चालले आहेत.
मानव मंगळावर पाऊल ठेवण्याच्या तयारीत असताना या ग्रहाने आपले स्वरूप बदलण्यास सुरुवात केली आहे. शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, मंगळाच्या परिवलनाचा वेग दरवर्षी 4 मिलीमीटर आर्कसेपंद दराने वाढत आहे. मंगळावरील एक दिवस आता एका सेपंदाच्या काही हजारव्या भागाइतका लहान होत आहे. हा बदल अगदी किरकोळ आहे. पण अवकाश विज्ञानात इतका छोटासा बदलही खूप अर्थपूर्ण ठरतो.
मंगळ वेगाने का धावतोय?
शास्त्रज्ञ अद्याप याचे नेमके कारण शोधत आहेत, परंतु ते अद्याप याची दोन कारणे शोधत आहेत. मंगळाच्या ध्रुवांवर जमा झालेल्या बर्फाचे वजन जसजसे बदलत जाईल, तसतसे ग्रहाचे वस्तुमान पेंद्राकडे सरकत आहे, असे त्यांचे मत आहे. दुसरीकडे, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की मंगळाच्या आतील भाग म्हणजेच त्याचा गाभा आणि प्रावरण यांच्यात घर्षण किंवा बदलदेखील त्याचा वेग वाढवू शकतात.
काय परिणाम होईल?
सध्या हा बदल इतका किरकोळ आहे की आपल्याला तो जाणवणार नाही, परंतु हजारो वर्षांत तो मंगळाचे पॅलेंडर पूर्णपणे बदलू शकतो. परंतु मंगळाचा अचूक वेग जाणून घेणे नासाच्या आर्टेमिस आणि भविष्यातील मानवी मोहिमांसाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण लँडिंग आणि नेव्हिगेशन या वेगावर अवलंबून असते.




























































