शहीदांच्या पत्नीला पुनर्विवाहानंतरही मिळणार वेतन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नक्षलवादी किंवा अतिरेक्यांचा किंवा संघटित गुन्हेगारीचा बीमोड करताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱयांच्या पत्नीने पुनर्विवाह केल्यानंतरही पत्नीला वेतनाचे लाभ मिळणार आहेत.

नक्षलवादी, अतिरेकी कारवाई तसेच दरोडेखोरी, संघटित गुन्हेगारीविरोधी कारवाई आणि कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या अधिकारी किंवा पोलिसाच्या विधवा पत्नीला शासनाकडून वेतन दिले जाते. मात्र, पुनर्विवाह केल्यानंतर शहिदांच्या पत्नीचे वेतन बंद करण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील अनेक शहीदांच्या पत्नी व कुटुंबीयांनी याबाबत तक्रार केली होती. विधवांनी पुनर्विवाह केल्याने शहीदांच्या कुटुंबीयांचीसुद्धा फरफट सुरू होती.