‘बॉक्सिंगक्वीन’ मेरी कोम मुंबई मॅरेथॉनची ‘सदिच्छादूत’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mary-kom

सामना प्रतिनिधी । मुंबई

सहावेळा महिला बॉक्सिंगचे विश्वविजेतेपद मिळवणारी आणि ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवलेली मेरी कोम यंदा 20 जानेवारी रोजी होणाऱया आयएएफ गोल्ड लेबल 16 व्या टाटा मुंबई मॅरेथॉनची ‘सदिच्छादूत’ असल्याचे आज जाहीर करण्यात आले आहे.

टाटा मुंबई मॅरेथॉनची ‘सदिच्छादूत’ म्हणून नेमणूक झाल्याबद्दल मेरी कोम म्हणाली, टाटा-मुंबई मॅरेथॉनने धावण्याच्या स्पर्धामध्ये देशात क्रांती घडवली आहे. मानवी शक्तीची सर्वोत्तम कामगिरी घडवणारे देशातील सर्वात मोठे व्यासपीठ आहे. प्रत्येक यशाची एक कहाणी आणि त्याला सहाय्यकांच्या मेहनतीची जोड असते हे मला एक क्रीडापटू आणि आई म्हणून माहीत आहे. मी माझ्या खेळामध्ये सर्वोत्तम आहे की नाही हे मला माहीत नाही, पण प्रत्येक वेळी मला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मला मिळत असते.