
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
परदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या मुंबई जवळील घारापुरी बेटावर सोमवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने उपस्थिती लावली. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने घारापुरी येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी एक प्रदर्शन आयोजित केले होते. या कार्यक्रमाला क्रिकेटमधला देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, उरणच्या तहसिलदार कल्पना गोडे, सहा. पोलिस आयुक्त विठ्ठल दामगुडे, शिवसेनेचे घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे, ग्रामसेवक अमित तपकिरे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी सचिन तेंडूलकर यांना घारापुरी येथिल प्रसिद्ध त्रिमुर्तीची प्रतिकृती भेट देऊन त्यांचे स्वागत केले.





























































