
माथेरानमध्ये पर्यटकांना लवकरच स्लिपिंग पॉडचा पाहुणचार घेता येणार आहे. उन्हाळय़ात माथेरान परिसरात दररोज हजारो पर्यटक भेट देतात. अनेकदा देशविदेशातील पर्यटकही येथे येतात. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने माथेरान येथे स्लिपिंग पॉड हॉटेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पर्यटकांना माफक दरात पंचतारांकित हॉटेलप्रमाणे सोयीसुविधा मिळणार असून रेल्वेलाही लाखो रुपयांचा महसूल मिळणार आहे.
रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे स्लिपिंग पॉड हॉटेल सुरू केले आहे. त्याला प्रवाशांसह पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे माथेरान येथे येणाऱया पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने नॉन फेअर रेव्हेन्यू इन्कम स्कीम (एनआयएनएफआरआयएस)चा एक भाग म्हणून पॉड हॉटेल उभारले जाणार आहे. 758 चौरस मीटर जागेवरील या पॉड हॉटेलचे संचालन ई-लिलावाद्वारे पंत्राटदाराला देण्यात आले आहे.























































