माथेरानची राणी घसरली, पर्यटकांचा हिरमोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । माथेरान

माथेरानची राणी शुक्रवारपासून नेरळपर्यंत धावू लागली असतानाच रविवारी दुपारी तिला पुन्हा अपघाताचे तोंड पाहावे लागले. दुपारी 12.30 च्या सुमारास तिचा लगेज डबा रुळांवरून घसरला. यात कोणालाही इजा झाली नाही. हा डबा तातडीने स्टाफनेच आपल्याकडील साहित्याने उचलून पुन्हा रुळांवर चढवला आणि दुपारी 2 पर्यंत पुन्हा सेवा सुरूही करण्यात आली.