चोरी करणाऱ्या मोलकरणीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठ लाख रुपये रोख आणि चांदीची भांडी चोरीप्रकरणी हेमा मोरे या मोलकरणीला माटुंगा पोलिसांनी अटक केली. गेल्या तीन वर्षांत तिच्या खात्यात सुमारे अकरा लाख रुपये जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी ती रक्कम गोठवली आहे. तक्रारदाराकडे हेमा ही सात वर्षांपासून काम करायची.तक्रारदार यांच्या घरातून वारंवार पैसे आणि चांदीच्या वस्तू कमी होत होत्या. त्यामुळे त्यांनी घरात एक छुपा कॅमेरा बसवला. तेव्हा हेमा ही कपाटातून पैसे चोरत असल्याचे त्याच्या मुलाच्या लक्षात आले. याप्रकरणी तक्रारदाराने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार केली. हेमाने वस्तू चोरल्याची पोलिसांना कबुली दिली आहे.