धर्मांतरविरोधी कायद्याबाबत पुनर्विचार करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या मुद्दय़ावरून राजकारण तापत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारने लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतरविरोधी आणलेल्या अध्यादेशास समाजवादी पार्टीने विरोध केला आहे. त्यापाठोपाठ बसपा नेत्या मायावती यांनी धर्मांतरविरोधी कायद्याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

विवाहाच्या नावाखाली होत असलेली फसवून आणि सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने प्रस्तावित केलेल्या वटहुकुमास राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंजुरी दिली. त्यानंतर बरेली जिह्यात यासंदर्भातील पहिला गुन्हादेखील दाखल झाला आहे, मात्र ‘लव्ह जिहाद’संदर्भात सरकारने आणलेल्या या वटहुपुमाबद्दल विरोधी पक्षांकडून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. देशात जबरदस्ती व कपटाने धर्मांतरणास विशेष मान्यताही नाही व स्वीपृती नाही. यासंबंधी अनेक प्रभावी कायदे अगोदरपासून आहेत. त्यामुळे लव्ह जिहादचे निमित्त करून करण्यात येत असलेल्या कायद्यावर सरकारने पुनर्विचार करावा, ही बसपाची मागणी असल्याचे मायावती यांनी ट्विट करत म्हटले आहे.