ट्रान्सफॉर्मरच्या प्रचंड स्फोटाने राहटोली हादरले, तीन ग्रामस्थ होरपळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । बदलापूर

महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट झाल्याने तीन ग्रामस्थ होरपळल्याची घटना येथील राहटोली गावात घडली आहे. यातील एकजण उकळत्या ऑईलमुळे गंभीर जखमी झाला असून त्यांना डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राहटोली येथील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट झाला. त्यामधील उकळते ऑइल जोराने बाहेर फेकले गेले. त्यावेळी ट्रान्सफॉर्मरजवळून जाणारे जगताप यांच्या अंगावर हे ऑइल पडले. यात जगताप यांच्या अंगावरील कपड्यांनीही पेट घेतला. सुदैवाने आरडाओरडा ऐकून ग्रामस्थांनी धाव घेऊन पाणी टाकून आग विझवली. जगताप यांना तत्काळ उपचारार्थ डोंबिवली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यावेळी गावातील इतर दोन व्यक्तीनाही किरकोळ दुखापत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सातत्याने बिघाड होतातच कसे?
स्फोट झालेला ट्रान्सफॉर्मर वर्षभरापूर्वीच बसविण्यात आला होता. आश्चर्य म्हणजे दर दोन-तीन महिन्यांनी नादुरुस्तीच्या नावाखाली ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येतो. त्यामुळे सातत्याने बिघाड होतातच कसे, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.