एमडी महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन 25 जुलैला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महर्षी दयानंद महाविद्यालयाची स्थापना होऊन 57 वर्षे झाली आहेत. या महाविद्यालयात शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांची संघटना दरवर्षी माजी विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलन आणि अन्य उपक्रम आयोजित करत असते. यावर्षी गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून संघटनेने वार्षिक सभा व स्नेहसंमेलन रविवारी 25 जुलै 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता ऑनलाइन पद्धतीने आयोजित करायचे ठरवले आहे. या सभेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी https://t.me/mdalumni या लिंक आधारे टेलिग्राम गटात सामील व्हावे, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे. प्रत्यक्ष वार्षिक सभेसाठी गुगल मीटची लिंक याच गटावर 25 जुलैला पाठवली जाणार आहे.