दै. ‘सामना’च्या मेधा पालकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, राज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर

पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. पाच ज्येष्ठ पत्रकारांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘दैनिक’ सामनाच्या मेधा पालकर आणि ‘दोपहर का सामना’चे राजन पारकर यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी जाहीर झाला आहे.

‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राही भिडे, सुधीर पाठक, विजय बाविस्कर आणि बाळासाहेब जाधव यांचा समावेश आहे. याशिवाय पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध विभागांतून देण्यात येणारे विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. दैनिक ‘सामना’च्या पुणे प्रतिनिधी मेधा पालकर यांना नानासाहेब परुळेकर पुरस्कार, तर उत्कृष्ट हिंदी पत्रकारितेसाठी राजन पारकर यांना बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.