
जर दोन पक्षांमध्ये वाद असेल तर सर्वोत्तम उपाय म्हणजे मध्यस्थी. मध्यस्थी ही दोन्ही पक्षांसाठी एक यशस्वी आणि फायदेशीर प्रक्रिया मानली जाते, ज्यामुळे दोन्ही पक्षांना आनंददायी निकाल मिळतो, असं सरन्यायाधीश (CJI) सूर्य कांत म्हणाले आहेत. गोव्याच्या पणजी येथे आयोजित ‘मध्यस्थता जागरूकता’ कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.
सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने स्टेकहोल्डर्सना संदेश देण्यासाठी ‘मीडिएशन फॉर नेशन’ ही मोहीम सुरू केली आहे. त्यांनी सांगितले, “हा संदेश केवळ न्याय मिळवण्यासाठी लढणाऱ्या लोकांसाठीच नाही तर, बार आणि बेंच सारख्या थेट स्टेकहोल्डर्सठीही आहे.” मध्यस्थी हे एक यशस्वी साधन असल्याचे सांगताना त्यांनी म्हटले की, हे जुन्या आणि नव्या प्रकरणांमध्ये तसेच खटला दाखल होण्यापूर्वीच्या टप्प्यातही लागू होऊ शकते.





























































