
तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारदरा आणि मुळा धरण पाणलोटक्षेत्रात बुधवारी पुन्हा पावसास सुरुवात झाली. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी पावसाचे प्रमाण किंचित वाढले. काल दिवसभरात ‘भंडारदरा’त पडलेल्या पावसाची नोंद 7 मि.मी. झाली आहे.
आठ दिवसांपूर्वी भंडारदरा पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने धरणात मोठय़ा प्रमाणात नवीन पाण्याची आवक झाली; पण दोन दिवसांपासून पाऊस झाला नाही. त्यामुळे नवीन पाण्याची आवक मंदावली. पावसामुळे आंबित बंधारा आणि पिंपळगाव खांड धरण भरले. पण पुढे या भागातही पाऊस थांबला आणि मुळा नदीतील विसर्ग काल सायंकाळी 705 क्युसेकवर आला. गुरुवारी सायंकाळनंतर रिमझिम पावसास सुरुवात झाली. शुक्रवारी रिपरिप सुरू होती. गेल्या 24 तासांत झालेला पाऊस (मि.मी.मध्ये) ः भंडारदरा 6, घाटघर 29, पांजरे 9, रतनवाडी 10.



























































